बुधवार, 30 मई 2012

कुणीतरी होता...(a marathi poem by amit sir)

:कुणीतरी होता: रचनाकार:अमित सर:

कुणीतरी होता ,माझा मन वाचणारा!!!
माझ्या बरोबर माझ्या दुखाःत चालणारा!!!

जेव्हां मी काहीच नव्हतो
तेव्हां ती होती
मी जसा होतो तसा
मला स्वीकारणारी
माझ्यासाठी स्वतः चा
अस्तित्व हरविणारी
खूप प्रेम करणारी
माझे दुखः हरणारी
पण हरवली कुठे ती?हृदयावर पडला गारा
कुणीतरी होता ,माझा मन वाचणारा!!!

जेव्हां पैशे होते
सर्वांनी साथ दिला
जे मित्र नव्हते
त्यांनीही हात दिला
पण गरिबी आली
तेव्हा,फक्त ती होती
माझ्या पाठीशी खंबीरपणे
तीच  उभी होती
पण आज ती नाही जवळ , अन मी बिचारा
कुणीतरी होता ,माझा मन वाचणारा!!!

जेव्हां एकटा होतो
तीच  विचारायची
माझ्या अशांत मनाला
तीच शांत करायची
दुखः झळकले नाही
कधी माझ्या चेहऱ्यावर
पण उमटली निशाणे
त्यांची,तिच्या हृदयावर
पण समोर नाही ती आज;दुर्दैवच सारा
कुणीतरी होता ,माझा मन वाचणारा!!!

तिला पाहून कसा
हृदय शांत वाटायचा
काम कुठलाही असो
मन पूर्ण लागायचा
आता ती नाही,तर!
जगण कठीण वाटते
आनंदाची क्षणे ही
कसी क्षिण भासते
पण गेला कुठे आनंदाची क्षणे लिहिणारा
कुणीतरी होता ,माझा मन वाचणारा!!!
माझ्या बरोबर माझ्या दुखाःत चालणारा!!!



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें